प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी आजच अर्ज करा वय १८ ते ४० व वयाच्या ६० वर्षानंतर दरमहा ३००० मिळवा
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील ४२ कोटी मजुरांना लाभ मिळणार आहे. या योजनेत १८ ते ४० वर्षे वयोगटातील मजूर अर्ज करू शकतात, त्यांना ६० वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला ५५ ते २०० रुपये हप्ता भरावा लागेल. वयाची ६०पार केल्यानंतरच कामगारांना पेन्शनची रक्कम मिळण्यास सुरुवात होईल. प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजनेद्वारे, ज्यांचे उत्पन्न १५००० किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन दिली जाते. नोकरदारांना निवृत्तीनंतर पेन्शन सुविधेचा लाभ मिळतो, मात्र असंघटित क्षेत्रातील कामगारांना अशी कोणतीही सुविधा मिळत नाही. पीएम श्रम योगी मानधन योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगार जसे की, चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, घरकामगार, भट्टी कामगार इत्यादींना मिळू शकतो. जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने साठी पात्रता - प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारने काही पात्रता निश्चित...