गृहनिर्माण सोसायटींसाठी महत्त्वाची बातमी! डीम्ड कन्व्हेयन्स तातडीने करुन घ्या. राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नसल्याची दखल घेत राज्याच्या सहकार विभागाने सोसायटी नोंदवितानाच बांधकाम व्यावसायिकांकडून अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेयन्स) अत्यावश्यक कागदपत्रे घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे सोसायट्यांचा अभिहस्तांतरण करून घेण्याचा कायमचा त्रास संपुष्टात येणार आहे. कन्व्हेअन्ससाठीची आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी कन्व्हेअन्स करून नाही दिला. तर सोसायटीने केवळ अर्ज व सोसायटीचा ठराव दिल्यास 'डीम्ड कन्व्हेअन्स'ची (मानवी अभिहस्तांतरण) प्रक्रिया पूर्ण करून जमीन सोसायटीच्या नावावर केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. बांधकाम व्यावसायिक सोसायटी नोंदवून सोसायटीचा कारभार सदनिकाधारकांकडे सोपवितात. सोसायटी नोंदविल्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये कन्व्हेअन्स करून देणे आवश्यक असते. मात्र, कन्व्हेअन्स करून देण्यास बांधकाम व्यावसायिकांकडून टाळाटाळ केली जाते. सद्यस्थितीत बांधकाम व्यावसायिक कन्व्हेअन्स कर...