गृहनिर्माण सोसायटींसाठी महत्त्वाची बातमी! डीम्ड कन्व्हेयन्स तातडीने करुन घ्या.
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नसल्याची दखल घेत राज्याच्या सहकार विभागाने सोसायटी नोंदवितानाच बांधकाम व्यावसायिकांकडून अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेयन्स) अत्यावश्यक कागदपत्रे घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे सोसायट्यांचा अभिहस्तांतरण करून घेण्याचा कायमचा त्रास संपुष्टात येणार आहे.
कन्व्हेअन्ससाठीची आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी कन्व्हेअन्स करून नाही दिला. तर सोसायटीने केवळ अर्ज व सोसायटीचा ठराव दिल्यास 'डीम्ड कन्व्हेअन्स'ची (मानवी अभिहस्तांतरण) प्रक्रिया पूर्ण करून जमीन सोसायटीच्या नावावर केली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
बांधकाम व्यावसायिक सोसायटी नोंदवून सोसायटीचा कारभार सदनिकाधारकांकडे सोपवितात. सोसायटी नोंदविल्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये कन्व्हेअन्स करून देणे आवश्यक असते. मात्र, कन्व्हेअन्स करून देण्यास बांधकाम व्यावसायिकांकडून टाळाटाळ केली जाते.
बांधकाम व्यावसायिकाचा हक्क संपुष्टात येणार.
बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सोसायटीकडे हस्तांतरण करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून ही प्रक्रिया करण्यात येत नसल्याने सहकार विभागाकडून 'डीम्ड कन्व्हेअन्स' करून देण्यात येते. सोसायटीचे हस्तांरण न झाल्यास भविष्यात सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल, तर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून मिळणे, हक्काचा पुरावा म्हणून मिळणारे प्रॉपर्टी कार्ड किंवा सदनिकेची खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत. मात्र, डीम्ड कन्व्हेअन्स झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतात; तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा हक्क संपुष्टात येतो.
डीम्ड कन्व्हेअन्स'साठी आवश्यक कागदपत्रे
1) मोफा कायद्याच्या नियमातील नमुना ७मधील अर्ज.
2) सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/ कंपनी नोंदणी प्रमाणपत्र/डीड ऑफ डिक्लरेशनची प्रत.
3) विकासकाने मंजूर करून घेतलेल्या रेखांकनामध्ये (लेआउट) समाविष्ट असलेल्या सर्व्हे / गट नंबरचा ७/१२ उतारा किंवा मिळकतपत्रिकांचा तीन महिन्यांच्या आतील उतारा
4) प्रत्येक सभासदाच्या सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत किंवा इंडेक्स-२
5) सहकारी गृहनिर्माण संस्थेने अभिहस्तांतर करून देण्यासाठी महाराष्ट्र वेश्म अधिनियम १९७० अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस.
6) संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची यादी.
7) नियोजन प्राधिकरणाने प्रमाणित केलेले बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र
8) नियंत्रित सत्ताप्रकार, नवीन अविभाज्य शर्त किंवा भोगवटादार वर्ग २ अशा नोंदी ७/१२ वर किंवा मिळकत पत्रिकेवर असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची जमीन हस्तांतरासाठी किंवा बिनशेती करण्यासाठी घेतलेल्या परवानगीच्या आदेशाची प्रत (लागू असल्यास).
कन्व्हेअन्सची आवश्यक का ?
बांधकाम व्यावसायिकांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सोसायटीकडे हस्तांतरण करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून ही प्रक्रिया करण्यात येत नसल्याने सहकार विभागाकडून 'डीम्ड कन्व्हेअन्स' करून देण्यात येते. सोसायटीचे हस्तांरण न झाल्यास भविष्यात सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल, तर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून मिळणे, हक्काचा पुरावा म्हणून मिळणारे प्रॉपर्टी कार्ड किंवा सदनिकेची खरेदी-विक्री व्यवहार होत नाहीत. मात्र, डीम्ड कन्व्हेअन्स झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतात; तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा हक्क संपुष्टात येतो.
डीम्ड कन्व्हेअन्स' सस्थेची जमीन संस्थेच्या नावावर केल्यास होणारे लाभ.
१) सातबारावर गृहनिर्माण संस्थेचे नाव आले की, संस्था स्थापन करण्याचा उद्देश पूर्ण होतो.
२) सदनिकेची विक्री करणे सोपे होते, सदनिकेवर कर्ज काढणे सुलभ होते.
३) मालमत्ता मोकळी आणि विक्रेय होते, म्हणजेच प्रॉपर्टी क्लिअर टायटल होते.
४) मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढणे आणि विक्री करणे सुलभ होते.
५) वाढीव चटईक्षेत्राचा लाभ घेण्यासाठी वाढीव बांधकाम मंजूर करून अधिक बांधकाम करून आर्थिक लाभ मिळवता येतो.
६) टीडीआर विकत घेऊन अधिक मजल्यांचे बांधकाम करून निधी उभारता येतो.
७) इमारतींवर मोबाइल टॉवर किंवा जाहिरात फलक उभे करून त्यापासून लाखो रुपये निधी उभारता येतो.
८) सदनिकेची किंमत वाढते..
९) बिल्डरला सुधारित बांधकाम मंजूर

Comments
Post a Comment