महाराष्ट्र शासन निवास व न्याहरी योजनेची ठळक मार्गदर्शक तत्त्वे,रोजगाराच्या संधी, माहिती,स्थानिक घरमालकांना फायदे, व आवश्यक कागदपत्रे
निवास व न्याहरी योजना हिवाळ्यात खऱ्या अर्थाने पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. नाताळच्या सुट्ट्या, नवीन वर्षाच्या सुट्ट्या आल्या की सगळेजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यातही आता धार्मिक पर्यटनही वाढू लागले आहे. निसर्ग पर्यटनाच्या जोडीने धार्मिक ठिकाणी जाण्यास आजकाल प्राधान्य दिले जाते. मात्र, सर्वच पर्यटनस्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसतात. आधुनिक काळातील प्रचार-प्रसाराची, दळणवळणाची साधने विकसित झाल्याने पर्यटन उद्योगास विशेष चालना मिळत आहे. आर्थिक दृष्टिकोनातून पर्यटन उद्योग महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यात अनेक ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित करण्यात आली असून तेथे पर्यटक संकुलेही बांधण्यात आलेली आहेत. याखेरीज अनेक ठिकाणे पर्यटन केंद्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. तेथे पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यासाठी पुरेशी पर्यटन संकुले उभारणे ही महत्त्वाची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी महामंडळाने पर्यटकांसाठी निवास व न्याहरी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे. पर्यटनस्थळांची व्यवस...