Skip to main content

महाराष्ट्र शासन निवास व न्याहरी योजनेची ठळक मार्गदर्शक तत्त्वे,रोजगाराच्या संधी, माहिती,स्थानिक घरमालकांना फायदे, व आवश्यक कागदपत्रे

 

निवास व न्याहरी योजना

हिवाळ्यात खऱ्या अर्थाने पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. नाताळच्या सुट्ट्या, नवीन वर्षाच्या सुट्ट्या आल्या की सगळेजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यातही आता धार्मिक पर्यटनही वाढू लागले आहे. निसर्ग पर्यटनाच्या जोडीने धार्मिक ठिकाणी जाण्यास आजकाल प्राधान्य दिले जाते.
मात्र, सर्वच पर्यटनस्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसतात. आधुनिक काळातील प्रचार-प्रसाराची, दळणवळणाची साधने विकसित झाल्याने पर्यटन उद्योगास विशेष चालना मिळत आहे. आर्थिक दृष्टिकोनातून पर्यटन उद्योग महत्त्वाचा ठरतो. 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यात अनेक ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित करण्यात आली असून तेथे पर्यटक संकुलेही बांधण्यात आलेली आहेत. याखेरीज अनेक ठिकाणे पर्यटन केंद्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. तेथे पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यासाठी पुरेशी पर्यटन संकुले उभारणे ही महत्त्वाची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी महामंडळाने पर्यटकांसाठी निवास व न्याहरी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
पर्यटनस्थळांची व्यवस्था राखणे व नवीन पयर्टनस्थळे विकसित करणे ही पर्यटनाची महत्त्वाची अंगे होत. याअनुषंगाने देशी-परदेशी पर्यटकांना आकृष्ट करणे, यासाठी नियोजनपूर्वक प्रसिद्धी यंत्रणा उभी करणे, पर्यटकांच्या वाहतुकीची तसेच निवास-भोजनाच्या सोयी उपलब्ध करुन देणे हेदेखील उद्योग महत्त्वाचे घटक ठरतात. पर्यटन उद्योगांमुळे सेवा उद्योगांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. पर्यटनामुळे होणारा आणखी एक अतिशय महत्त्वाचा लाभ म्हणजे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या रोजगार संधी. 

रोजगाराच्या संधी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकृत मंजुरीमुळे घर मालकांना फायदा होतो. या योजनेत स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. बऱ्याच पर्यटनस्थळाच्या ठिकाणी बंगले, घरे व फ्लॅटस रिकामे पडून असतात. किंवा अशा निवासी स्थानाचा काही ठिकाणी कायमस्वरूपी वापर केला जात नाही.

अशा व्यवस्थेचा या योजनेखाली उपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या रिकाम्या जागांचा फायदा करून घेण्यात येत आहे. विशेषत: घरातील महिलांसाठी ही रोजगाराची चांगली संधी आहे. पर्यटक संकूल निर्माण करून आपला रिकामा वेळ दिला की उत्पन्नाचे साधन निर्माण होत आहे. यातूनच अहमदनगर जिल्ह्यातील ७ महिलांनी अशी पर्यटक संकुले निर्माण करून घराला हातभार लावला आहे.
या योजनेत सहभागी झालेल्या स्थानिकांच्या जागांची माहिती पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटकांना दिली जाते. तसेच पर्यटकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या निर्देशिकेमध्ये व महामंडळाच्या संकेतस्थळावरही (वेबसाईटवर) माहिती प्रसिद्ध केली जाते. जेणेकरून या घरमालकांना याचा फायदा होईल.

पर्यटकांसाठी फायदेशीर योजना

अनेक पर्यटनस्थळी राहण्याचा खर्च हा खूप असतो. तसेच आपल्याला पाहिजे तशा सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. 
दुसरा फायदा म्हणजे राज्याबाहेरील किंवा परदेशी पर्यटकांना स्थानिकांसमवेत राहण्याचा. त्यांची संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते व चालीरिती आणि स्थानिक खाद्यपदार्थांची ओळख होते. यातून राज्याच्या पर्यटन विकासालाही वाव मिळतो. स्वच्छ व घरगुती सोय झाल्यामुळे पर्यटकांचाही ओढा वाढेल.

योजनेची ठळक मार्गदर्शक तत्त्वे


  • अशी निवासस्थाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यता मिळवलेली असावीत.
  • निवासस्थाने अर्जदाराच्या अधिकृत मालकीची असावीत.
  • मान्यताप्राप्त जागी घरमालक पर्यटकांसाठी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त दहा खाटांची सोय निर्माण करील.
  • वास्तू स्वच्छ आणि शांत परिसरात असावी.
  • घराची रचना आकर्षक, उत्तम आणि मजबूत बांधकामाची, सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असावी.
  • जागेची व्यवस्था महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मान्य केलेल्या वर्गवारीप्रमाणे असावी.
  • जागेवरील देखभालीसाठी आणि पर्यटकांची सोय पाहण्यासाठी घरमालक किंवा प्रतिनिधीची उपस्थिती आवश्यक असावी.
  • महिला पर्यटकांसाठी प्रसाधनगृहाची स्वतंत्र व्यवस्था असावी.
  • निवासी जागेत प्रथमोपचार व अग्निशमनाची व्यवस्था असावी.
  • आकारण्यात येणारे भाडे व खाद्य पदार्थांचे दर याची माहिती घर मालकाने महामंडळास आगाऊ द्यावी.
  • पर्यटकांची नावे, पत्ते, वेळ व तक्रारीसाठी नोंदणी बुक ठेवण्यात यावेत.
  • घर मालकास दिलेले नोंदणीपत्र रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास राहील.
  • नोंदणीपत्र मिळण्यासाठी घरमालकाने विहित अर्जाच्या नमुन्यामध्ये अर्ज करावा.
  • महामंडळाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार घर नसेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो.

स्थानिक घरमालकांना फायदे


  • रिकाम्या जागेचा फायदेशीर उपयोग आणि पर्यटन विकास कामाला हातभार.
  • महामंडळ जागेसंबंधीचा पर्यटकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या निर्देशिकेमध्ये विनाशुल्क समावेश करण्यात येईल.
  • पर्यटन माहिती केंद्राद्वारे स्थानिक घरमालकांच्या या योजनेखाली उपलब्ध जागेची माहिती इच्छुक पर्यटकांना देण्यात येते.
  • स्थानिक घरमालकांचा मार्केटिंग करण्याचा त्रास आणि खर्च वाचेल, कर आकारणीत वाढ होणार नाही असे प्रयत्न केले जातील.
  • उपलब्ध घरावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकृत पर्यटन विकास महामंडळाच्या विविध पत्रकांचे माहितीसाठी वाटप करण्यात येईल.
  • न्याहरी व निवास योजनेमुळे बऱ्याच कुटुंबांना अधिकृत रोजगार मिळणार आहे.

पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारी योजना राबविण्यासाठी अर्जदाराने खालील कागदपत्रे सादर करावीत
1) आधार कार्ड 
2) पॅन कार्ड 
3) 7/12 चा उतारा
4) प्रॉपर्टी कार्ड 
5) 7/12 च्या उताऱ्यातील इतर संबंधितांचे संमतीपत्र
6)  ग्रामपंचायत/नगरपरिषद/नगरपालिका/महानगरपालिका यांचे निवास व न्याहारी योजना राबवणेबाबत ना हरकत प्रमाणपत्र
7) जागेचा आराखडा
8)चरित्र पडताळणी दाखला
9) घराचा टॅक्स भरल्याची पावती
10)रेशनिंग कार्डाची छायांकित प्रत
11) लाईट, पाणी, दूरध्वनी बिलांची छायांकित प्रत
12)  धनाकर्ष (DD) मपविम (MTDC) च्या नावे
13) फूड लायसन्स 
14) मेनू कार्ड 
15) हॉटेल फोटो सर्व 
16) ना हरकत दाखला शेजारी 

महितीसाठी सादर 
अश्वटेक कम्प्युटर महाबळेश्वर 
मो. 9421116604 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...