बऱ्याच वेळेला आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो. त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी (Jamin Mojani) करणे त्याचे मापन करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो. जमीन मोजणी - (Jamin Mojani) मोजणीसाठी लागणारे अर्ज आणि कागदपत्रेः शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाली तर शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षात अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धतः तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करणार आहात, त्या तालुक्याच आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. अर्जदाराची माहिती : पहिल्या पर्यायापुढे "अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता" याची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, गावाचं नाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. मोजणीचा कालावधीः दुसरा पर्याय म्हणजे "मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी (jami...