बऱ्याच वेळेला आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो. त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी (Jamin Mojani) करणे त्याचे मापन करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो.
जमीन मोजणी - (Jamin Mojani)
मोजणीसाठी लागणारे अर्ज आणि कागदपत्रेः
शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाली तर शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षात अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची पद्धतः
तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करणार आहात, त्या तालुक्याच आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे.
अर्जदाराची माहिती :
पहिल्या पर्यायापुढे "अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता" याची माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, गावाचं नाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे.
मोजणीचा कालावधीः
दुसरा पर्याय म्हणजे "मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी (jamin Mojani) प्रकाराचा तपशील हा आहे. यामध्ये मोजणीच्या प्रकारासमोर
"मोजणीचा कालावधी" आणि "उद्देश" लिहायचा आहे. पुढे तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक येथे टाकायचा आहे
मोजणीसाठी लागणारे शुल्कः
"सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम." हा तिसरा पर्याया समोर मोजणी (jamin Mojani) फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक व तारीख लिहायची आहे.
मोजणीसाठी लागणारा कालावधीः
मोजणीसाठी जी फी आकारली जाते, तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे. यावरून ठरत असते. जमीन मोजणीचे तीन प्रकार पडतात.
- साधी मोजणी (Jamin Mojani) जी 6 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाते,
- तातडीची मोजणी 3 महिन्यांमध्ये पूर्ण केली जाते,
- तर अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत पूर्ण केली जाते.
जमिनीच्या मोजणीवरून आकारण्यात येणारे शुल्कः
- एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास 1 हजार रुपये,
- तातडीच्या मोजणी (Jamin Mojani) साठी 2 हजार रुपये,
- अतितातडीच्या मोजणीसाठी 3 हजार रुपये शुल्क किंवा फी आकारली जात असते.
मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे. यानुसार शेतकरी तम्शी माहिती "कालावधी" या कॉलममध्ये लिहू शकतात.
उद्देशः
"उद्देश" या पर्यायासमोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहायचा आहे यामध्ये शेतजमिनीची हद्द किती आहे. कुणी बांधावर अतिक्रमण केलं आहे का, हे पाहायचं आहे, असा उद्देश शेतकरी लिहू शकतात,
जमिनीच्या सहधारकांची माहितीः
चौथ्या पर्यायामध्ये "सातबारा उताराप्रमाणे जमिनीचे सहधारक म्हणजे ज्या गट क्रमांकाची मोजणी (jamin Mojani) आणायची आहे, त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असल्यास त्यांची नावं, पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे. अशा संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात
पाचव्या पर्यायामध्ये "लगतचे शेतकरी यांची नावे आणि पत्ता" लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना ज्य ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या त्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहणं गरजेचं आहे.
अर्जासोबतच्या कागदपत्रांचं वर्णनः
- शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज,
- मोजणी Jamin Mojani) फीचं चलन किंवा पावती,
- 3 महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रं
जर तुम्हाला शेतजमिनीव्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दी निश्चित करायची असेल तर 3 महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते. ही सगळी माहिती भरून झाल्यावर कागपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.
कागदपत्रांची तपासणीः
हा अर्ज जमा केला की, तो ई-मोजणी या प्रणालीत दाखल केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून (Jamin Mojani) मोजणीसाठी किती फी लागणार आहे, याचं चलन जनरेट केलं जातं. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायची असते.
मोजणी अर्जाची पोहोचः
मोजणीचा रेजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तिथं तयार होतो. व शेतकऱ्याला मोजणी (Jamin Mojani) अर्जाची पोहोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.
ई-मोजनी बद्दल माहिती
अर्जदार यांच्या विनंतीनुसार त्यांच्या जमिनीची मोजणीकरुन मुळ अभिलेखाच्या आधारे त्यांच्या शंका, वाद मिटविले जातात. :
या विभागाकडुन हद्द्कायम, पोटहिस्सा, बिगरशेती, भूसंपादन, कोर्टवाटप, कोर्टकमीशन, गुंठेवारी मोजणी केली जाते.
तसेच अर्जदार यांनी भरणा केलेल्या मोजणी फ़ी नुसार नियमित, तातडी, अतितातडी, अतिअतितातडी या कालावधीच्या प्रकारात मोजणी केली जाते. अर्जदारांनी मोजणी अर्ज भरण्यापूर्वी त्यांचे सर्वे नंबर मधे अस्ते सर्व सहधारक आणि लगतधारक यांचे पूर्ण पत्ता आणि मोबाइल नंबर तयार ठेवावे.
• ई मोजणी पुर्वी अर्जामध्ये कार्यवाही कार्यालयातील कर्मचार्यांचे द्वारे केली जात असे. यामध्ये अर्जदार यांना मोजणीची तारीख मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत.
तसेच आपली मोजणी केव्हा होईल, मोजणीस कोण येईल, या बाबत कोणतीही माहिती अर्जदार यांना मिळत नव्हती. यासाठी ही खातेदारांना त्रास सोसावा लागत असे. या सर्वावर उपाय म्हणजे ई मोजणी होय.
ई मोजणी आज्ञावलीमध्ये अर्जदार यांना घरबसल्या, सेतुकेंद्रातून खाजगी व्यावसायिक इंटरनेटच्या माध्यमातुन तसेच कार्यालयातुन मोजणीचा अर्ज भरता येतो. प्रस्तुत अर्जाचा टोकन क्रमांक व ७/१२ घेवून भूमि अभिलेख कार्यालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज भरुन घेण्याची संपुर्ण कार्यवाही पार पडली जाईल.
• मोजणी फी भरल्यानंतर आपला अर्ज कार्यालयात स्विकारला जाईल व तात्काळ आपल्या मोजणी प्रकरणाचा मोजणी रजिष्टर क्रमांक, मोजणीची तारीख, मोजणी कर्मचारी व त्यांचा मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती असलेली पोहोच अर्जदार यांना दिली जाईल.
माहितीसाठी सादर
अश्वटेक कॉम्पुटर आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर
मो. ९४२१११६६०४
Comments
Post a Comment