आय.टी. आय. २०२५ ची प्रवेश प्रकिया चालू झाली आहे. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ मे २०२५ व अंतिम दिनांक अर्ज भरण्याचीः ३० जून २०२५
आय.टी.आय म्हणजे काय ? आय.टी.आय ही एक व्यावसायिक अभ्यासक्रमाची शासकीय/खाजगी संस्था आहे , जी विविध व्यवसायांमध्ये (ट्रेड्स) प्रशिक्षण देते. हे अभ्यासक्र ६ महिन्यांपासून २ वर्षांपर्यंत असू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी संबंधित व्यवसायात नोकरी करू शकतो किंवा स्वयंपूर्ण व्यवसाय सुरू करू शकतो. विद्युत , वेल्डिंग , फिटर , इलेक्ट्रॉनिक्स , संगणक ऑपरेटर , मेकॅनिकल व मोटार मेकॅनिक असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५ - 1. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ मे २०२५ 2. अंतिम दिनांक अर्ज भरण्याचीः ३० जून २०२५ 3. प्रथम गुणवत्ता यादी जाहीर होणेः ५ जुलै २०२५ 4. प्रवेश ( ITI Admission) प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधीः ३१ जुलै २०२५ पात्रता: · उमेदवाराने किमान इयत्ता ८वी , १०वी किंवा १२वी पास असणे आवश्यक आहे (व्यवसायानुसार पात्रता वेगळी असते). · उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. · ...