आय.टी. आय. २०२५ ची प्रवेश प्रकिया चालू झाली आहे. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ मे २०२५ व अंतिम दिनांक अर्ज भरण्याचीः ३० जून २०२५
आय.टी.आय म्हणजे काय?
आय.टी.आय ही एक व्यावसायिक अभ्यासक्रमाची शासकीय/खाजगी
संस्था आहे, जी विविध
व्यवसायांमध्ये (ट्रेड्स) प्रशिक्षण देते. हे अभ्यासक्र ६ महिन्यांपासून २
वर्षांपर्यंत असू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी संबंधित
व्यवसायात नोकरी करू शकतो किंवा स्वयंपूर्ण व्यवसाय सुरू करू शकतो. विद्युत, वेल्डिंग, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक ऑपरेटर, मेकॅनिकल व मोटार मेकॅनिक असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५ -
1. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ मे २०२५
2. अंतिम दिनांक अर्ज भरण्याचीः ३० जून २०२५
3. प्रथम गुणवत्ता यादी जाहीर होणेः ५ जुलै २०२५
4. प्रवेश (ITI Admission) प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधीः ३१ जुलै २०२५
पात्रता:
·
उमेदवाराने
किमान इयत्ता ८वी, १०वी
किंवा १२वी पास असणे आवश्यक आहे (व्यवसायानुसार पात्रता वेगळी असते).
·
उमेदवार
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
·
वयाची
किमान मर्यादा १४ वर्षे आहे. काही अभ्यासक्रमांसाठी इतर अटी लागू शकतात.
·
त्यानंतर
लॉगिन करून ऑनलाइन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे
राज्यातील आय. टी. आय संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम
(ट्रेड्स) उपलब्ध आहेत. काही प्रमुख अभ्यासक्रम असेः
फिटर
इलेक्ट्रिशियन
वेल्डर
टर्नर
डिझेल मेकॅनिक
कॉम्प्युटर ऑपरेटर
COPA (Computer Operator and Programming Assistant)
प्लंबर
सिव्हिल ड्राफ्ट्समन
व्यवसाय तपशीलाची यादी व पात्रता
: https://admission.dvet.gov.in
या अभ्यासक्रमांची निवड उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता व
आवडीनुसार करता येते.
कागदपत्रांची यादी:
इयत्ता ८वी/१०वी/१२वीचे प्रमाणपत्र
जात व जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
रहिवासी प्रमाणपत्र
आधार कार्ड
पासपोर्ट साइज फोटो
शाळा सोडल्याचा दाखला
दिव्यांग सर्टिफिकेट (लागू असल्यास)
EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
विद्यार्थ्यांना काही उपयुक्त सूचनाः
·
सर्व
माहिती अचूक भरावी; चुकीची
माहिती दिल्यास प्रवेश रद्द केला जाऊ शकतो.
·
शेवटच्या
तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.
·
अर्ज
भरल्यानंतर एक किंवा अधिक पसंतीक्रम नोंदवावेत.
प्रवेश मिळाल्यानंतर संबंधित आय.टी. आय मध्ये
जाऊन वेळेत प्रवेश निश्चित करावा.

Comments
Post a Comment