Skip to main content

विविध कोर्सेस ऑनलाईन शिकवणाऱ्या विविध वेबसाइट्स आणि ऑनलाईन कोर्सचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या

ऑनलाईन कोर्सचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या

ऑनलाईन कोर्स जितका फायदेशीर आहे तितका नुकसान देणारा देखील ठरु शकतो. पण फायदा आणि नुकसान या दोन्हीसाठी विद्यार्थी स्वत: जबाबदार ठरतो. ऑनलाईन कोर्स करुन एकीकडे तुम्ही आपले स्किल्स वाढवता तर दुसरीकडे वेळखाऊ आणि आळशीपणाचे शिकार होऊ शकता. ऑनलाईन कोर्समुळे होणारे फायदे आणि नुकसान जाणून घ्या.

ऑनलाईन शिकवणी नेहमी उपलब्ध

ऑनलाईन शिकवणीत तुमचे शिक्षक तुम्हाला सातही दिवस २४ तास उपलब्ध असतात. तुम्ही त्यांच्याकडून लेक्चर मिळवू शकता, नोट्स मागू शकता, असाईनमेंट तपासू शकता, अभ्यासाचे प्रश्नोत्तरे घेऊ शकता, प्रश्नांवर चर्चा करु शकता, आपल्या सहकाऱ्यांसोबत चॅट करु शकता आणि तुमच्या वेळेप्रमाणे अभ्यास करु शकता

ऑनलाईन क्लासमध्ये मित्रांचा सहभाग

ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, मित्रवर्ग देखील सहभागी होऊ शकतात. विद्यार्थी जेव्हा इंटरनेटवर काही शोधत असतात तेव्हा आईवडीलांचे लक्ष राहते. आपला परिवार आणि मित्रांची मदत मिळाल्याने मुलांना यशस्वी होण्यास मदत होते.

ऑनलाईन क्लासमध्ये लवचिकता

ऑनलाईन कोर्स हा लवचिक आहे. म्हणजे तुम्ही वाटेल तेव्हा अभ्यास करु शकता. पाहीजे त्याच्यासोबत राहून अभ्यास करु शकता. तुम्ही तुमच्या आवडीचा ड्रेसअप करु शकता.

नलाईन कोर्स स्किल्स वाढतात

ऑनलाईन कोर्स प्रत्यक्ष जगातील स्किल्स शिकवतात. तुम्ही ऑनलाईन कोर्स पूर्ण कराल तेव्हा तांत्रिक कौशल्याच्या रुपात ईमेल आणि वेब ब्राऊजिंग देखील दाखवू शकता. इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळवणे, त्यातून शिकणे हे तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यातील संधी खुल्या करते. तुम्हाला ऑनलाईन नोकरी मिळू शकते, कॉलेजचे अर्ज ऑनलाईन मिळवू शकता. इतर अनेक कामे करु शकता.

ऑनलाईन वर्गाचे नुकसान वेळ

ऑनलाईन क्लासमध्ये ऑफलाईन क्लासपेक्षा जास्त वेळ लागतो. ऑन कॅम्पसमध्ये त्यापेक्षा कमी वेळ लागतो. कारण तिथे त्याप्रमाणे वातावरण असते. तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष शिक्षक किंवा मित्रांना भेटून शंका निरसन करता. पण इथे तुम्हाला शंका असल्यास मेसेज टाइप करुन संवाद साधावा लागतो. तुम्ही लिहिलेले वाचण्या किंवा ऐकण्यासाठी जास्त वेळ जातो.

ऑनलाईन कोर्स इंटरनेट

ऑनलाईन कोर्स अधिक शिथिल असतो. एखादा विद्यार्थ्यालाऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होण्यास उशीर होऊ शकतो. कारण इथे वर्गात वेळेत यायचं असं म्हणणारं नाहीय. असाइनमेंट वेळेत पूर्ण करा, परीक्षा जवळ आल्या आहेत असं वारंवार सांगणारे कोणी नसते. तुम्हाला कोणी उपदेश देत नाही. ऑनलाईन वातावरणात अभ्यास करुन असाइनमेंट टाळणे शक्य असते

ऑनलाईन क्लासमध्ये वेळेचे नियोजन

ऑनलाईन क्लासमध्ये शिकताना वेळेचे नियोजन असणे गरजेचे आहे. ही तुमच्या ऑनलाईन कोर्सची गरज आहे. तुम्हाला व्यक्तिगत वेळेचे कौशल्य अवगत करावे लागेल. ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी स्वयंशिस्तीची गरज असते. तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढावा लागेल.

ऑनलाईन क्लासमध्ये वर्गाप्रमाणे संवाद नाही.

ऑनलाईन क्लासमध्ये तुमच्यासोबत कोणी नसतं. कॉम्प्युटर हाच तुमचा सोबती असतो. पण कॅम्पसमध्ये तुमच्या आजुबाजूला विद्यार्थी मित्र असतात. शिस्त शिकवणारे शिक्षक असतात. पण ऑनलाईन कोर्समध्ये असे काही नसते.

ऑनलाईन कोर्समध्ये अॅक्टीव्ह लर्नर

ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला अॅक्टीव्ह लर्नर बनावे लागेल. यामध्ये केवळ तुम्हीच तुमच्या शिक्षणास जबाबदार आहात. तुमच्याकडून कोणी अभ्यास करवून घेणार नाही. स्वप्न पूर्ण करण्याची ठिणगी

विविध कोर्सेस ऑनलाईन शिकवणाऱ्या विविध वेबसाइट्स

१. गुगल कोर्सेस

गुगलने देखील ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रात आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे. learndigital.withgoogle.com या वेबसाइटवर विविध विषयांवरचे १२५ गुगल कोर्सेस उपलब्ध आहेत. आपल्या आवडत्या विषयासंबंधीचे मॉड्युल आणि वैयक्तिक वेळेच्या नियोजनानुसार तुम्ही हे कोर्सेस पूर्ण करू शकतात. तसेच कोर्स सर्टिफिकेट मिळण्यासाठी कोर्सच्या शेवटी दिलेली क्विझ किंवा प्रश्नमंजुषा पूर्ण करणे गरजेचे आहे.

गूगल कोर्सेस पुढीलप्रमाणे आहेत-

1) फंडामेंटल्स ऑफ डिजिटल मार्केटिंग 

2) गेट बिसिनेस ऑनलाईन 

3) इंप्रुव्ह युअर ऑनलाईन सिक्युरिटी 

4) इफेक्टिव्ह नेटवर्किंग 

5) बिझिनेस कम्युनिकेशन 

6) सोशल सायकोलॉजी 

7) टेक्निकल सपोर्ट फंडामेंटल 

8) फंडामेंटल्स ऑफ ग्राफिक डिझाईन 

9) इंग्लिश फॉर करियर डेव्हलपमेंट 

10) बिझिनेस रायटिंग

टाटा ई -लर्निंग कोर्सेस

टाटा ई -लर्निंग कोर्सेस हे बहुतांशी टेक्निकल आहेत. या कोर्सेसचा उद्देश कौशल्य विकसित करणे असून त्यांची फी केवळ नाममात्र रुपये तीनशे आहे.

पुढील विषयांसाठी ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत-

इण्डस्ट्री ४.० (२महिने/३००रुपये फी ) ( www.youtube.com/watch?v=mD9wLNNPK7g)ही डेमो लिंक चेक करू शकता

टोटल क्वालिटी मॅनेजमेंट(२महिने/३००रुपये फी)( https://youtu.be/JxUA4jvycOI ) ही डेमो लिंक चेक करू शकता

इंग्लिश प्रोफिशिअन्सी ((२महिने/३००रुपये फी)

मेकॅनिकल (या विषयांतर्गत १४कोर्सेस आहेत)

मेटॅलर्जी (या विषयांतर्गत ७ कोर्सेस आहेत)

इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स (या विषयांतर्गत १२ कोर्सेस आहेत)

कम्प्युटर सायन्स (या विषयांतर्गत एम एस ऑफिस, अॅडव्हान्स एक्सेल, मशीन लर्निंग)

मॅनेजर (बिझनेस स्किल्स फॉर मॅनेजर्स-फी रुपये ३०००/१२महिने)

 स्वयं कोर्सेस (https://swayam.gov.in/)

स्वयं कोर्सेस हा भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा उपक्रम असून ५०० हून अधिक 'फ्री' कोर्सेस या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे कोर्सेस बंगाली, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड अशा आठ भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

सरकारने डेथ इन्श्युरन्स बेनिफिटचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय.सर्व खाजगी नोकरदारांनच्या वारसानां PF कढुन फ्री मध्ये मिळते 7 लाख रुपयांचा विमा. कोविड-19 ने होणार्‍या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो.तुमच्या वारसानां तुमच्या मागे हा विमा  घरी बसल्या ऑनलाईन सहज मिळू शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर लवकरचं तुमचा वारस ( नॉमिनी ) करून घ्या.विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये वारस नोंदणी करून घ्यावी लागेल.आमच्याकडे पीएफ संबंधित PF KYC, UAN Active, PF Advance, Final PF Withdrawal, PF Nominee ad  व इतर सर्व कामे केले जाते. ( संपूर्ण महाराष्ट्रात ) संपर्क करा. 7900094419

या वेबसाईटवर पुढील विषयाचे कोर्सेस उपलब्ध आहेत.

प्रोग्रामिंग C++, क्लाउड कम्प्युटिंग, इंट्रोडक्शन टू इंटरनेट, मॉडर्न अल्जेब्रा, सॉफ्ट स्किल्स, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन टु रिसर्च मेथोडॉलॉजी, लँग्वेज अँड माईंड, इमोशनल इंटेलिजन्स इत्यादी.

या कोर्सेसचं वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत ई-बुक्स आणि व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहेत..    

 कोर्सेरा (https://www.coursera.org/)

कोर्सेरा कोर्सेसचे निर्माण जगातील नामांकित विद्यापीठांनी आणि कंपन्यांनी होतकरू तरुणांना त्यांच्या उपयुक्त करिअरमध्ये 'स्किल डेव्हलपमेंट' (कौशल्य विकास)साठी उपयोग होईल यासाठी केले आहेत. आयबीएम, युनिव्हर्सिटी ऑफ मॅसेंच्युएट्स, युनिव्हर्सिटी ऑफ टोरोंटो, युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन, युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हिया इत्यादींचा त्यात समावेश होतो. हे कोर्स पूर्ण करून कोर्सच्या स्वरूपानुसार अथवा टाइपनुसार सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री एखादा तरुण अथवा तरुणी प्राप्त करू शकतो/शकते. यातील काही कोर्सेस मोफत असून काहींसाठी फी आकारली जाते.

कोर्सेरा पुढील विषयाचे कोर्सेस आयोजित करतात-

आर्ट अँड हुमॅनिटीज (हिस्टरी,फिलॉसॉफी,म्युझिक अँड आर्ट), बिझनेस (लीडरशिप मॅनेजमेंट, फायनान्स, मार्केटिंग, बिझनेस स्ट्रॅटेजी इत्यादी), डेटा सायन्स (पायथॉन, एक्सेल, SQL, Tableau, TensorFlow, आर्टिफिशल इंटेलिजन्स, इत्यादी), कम्प्युटर सायन्स (जावा, C++, ब्लॉकचेन, HTML, Agile इत्यादी), इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी (AWS, सायबर सिक्युरिटी, गुगल , SAP), हेल्थ (बेसिक सायन्स, हेल्थ इन्फोमॅटीक्स, हेल्थकेअर मॅनेजमेंट, नुट्रीशन, पेशंट केयर इत्यादी), फिजिकल सायन्स अँड इंजिनीरिंग (इलेट्रीकल इंजिनीरिंग, मेकॅनिकल इंजिनीरिंग, केमिस्ट्री , फिसिक्स अँड ऍस्ट्रॉनॉमी इत्यादी), सोशल सायन्सेस

खान अकॅडेमी ( www.khanacademy.org )

खान अकॅडेमी मुळात लर्निंग रिसोर्सेसची लायब्ररी आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विदयार्थ्यांसाठी त्यांच्या इयत्तेप्रमाणे विषयांची मांडणी केली आहे. इयत्ता पहिलीपासून ते बारावी पर्यंत गणित विषयावरच्या व्हिडीओ लेक्चरची सुविधा उपलब्ध आहे. तसेच नववी ते बारावी पर्यंत सायन्स विषयावर व्हिडीओ लेक्चर्स उपलब्ध आहेत. (IIT-JEE) तसेच SAT, GMAT या परीक्षांची तयारी ऑनलाईन करून घेतली जाते. हे कोर्सेस मोफत असून आपण आपल्या वेळेच्या नियोजनानुसार आणि सोयीप्रमाणे पूर्ण करू शकतात. 

  ओपन कल्चर कोर्सेस (http://www.openculture.com/freeonlinecourses)

ओपन कल्चर कोर्सेस हे विविध विषयांवर रिसोर्स कोर्स वेब पोर्टल आहे. या वेबसाईटवर तुम्ही जसे विविध विषयावरचे कोर्सेस पाहाल तसेच त्या कोर्सच्या अनुषंगाने त्या विषयावरचे पॉडकास्ट, ऑडिओबुक्स व ई-बुक्स पाहू शकतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये हे कोर्स पोर्टल प्रसिद्ध आहे. आर्ट अँड आर्ट हिस्टरी, ऍस्ट्रॉनॉमी, बायलॉजी, बिझनेस, केमिस्ट्री, प्राचीन जग, इंजिनीरिंग, कम्प्युटर सायन्स इत्यादी विषयांवर मोफक कोर्सेस उपलब्ध आहेत.

 युडेमी (https://www.udemy.com/)

युडेमी ऑनलाईन कोर्सेस केवळ मात्र रुपये ४२० रुपये फीच्या माफक दरात उपलब्ध आहेत आणि www.udemy.com या वेब संकेतस्थळावर जाऊन कॅटेगरीज या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या आवडीचा कोर्स निवडू शकता.

11.मोफत कोर्सेस देणारे अन्य वेबसाईट्स पुढीलप्रमाणे आहेत-

1) हॉवर्ड युनिव्हर्सिटी :- (https://online-learning.harvard.edu/catalog/free)

2) ओपन याले युनिव्हर्सिटी :- (https://oyc.yale.edu/)

3) युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया :- (https://extension.berkeley.edu/)

4) MIT ओपनवेर कोर्सेस :- (https://ocw.mit.edu/index.htm)

5) युनिव्हर्सिटी ऑफ लंडन पॉडकास्ट :- (https://podcasts.ox.ac.uk/series) 

 6)  https://www.coursera.org/search?query=free%20.      

7) https://eskillindia.org/    

8) https://www.learnvern.com/  

9) https://www.openculture.com/   

10) https://www.khanacademy.org/  

 तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ? आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!   *आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


विलास उतेकर अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर   ९४२१११६६०४ 


नाव

ईमेल *

मेसेज *

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...