
आपले वीज बिल का वाढते? वीज कनेक्शन असणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त माहिती व हक्क.!!
गेल्या काही दिवसांत अनेक लोकांना भरमसाठ वीज बिल आले आहेत, आणि त्याची कारणे अनेक असतील पण रोजच्या जीवनात आपण या गोष्टीची खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या घरी मीटर रीडिंग घ्यायला येणाऱ्या व्यक्तीचे नाव, त्याचे ID प्रूफ बघणे आणि रीडिंग घेऊन गेलेल्या तारखेला त्याची सही घेणे.
तसेच पुढील महिन्यात हे मीटर रीडिंग बरोबर ३० दिवसांनी घेतले जाते कि नाही याची खात्री करणे. आणि जर का रीडिंग घेणारा व्यक्ती एक दिवस जरी लेट आला तर त्याची विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करा. कारण १०० युनिट पर्यंत विजेचे दर हे ३.७६ रुपये प्रति युनिट आहे.

परंतु जर का हेच रीडिंग लेट घेतले आणि आपले युनिट १०० च्या वर गेले तर आपल्याला त्याचे दुप्पट पैसे द्यावे लागतील.
म्हणजेच साधारण ७.६० रुपयांनी हे बिल आपल्याला भरावे लागेल. हेच युनिट जरा का ३०० च्या वर गेले तर ९.९० प्रति युनिट हे बिल आपल्याला भरावे लागेल. आणि ५०० वर युनिट गेले तर हेच दर चौपट होतील.
आपला निष्काळजी पणा आपल्या खिशाला कात्री लावू शकतो. जर का रीडिंग घेणार व्यक्ती लेट येत असेल तर आपले बिल हे वाढून आलेच समजा आणि याला जबाबदार आपण असाल. त्यामुळे त्या व्यक्तीला वठणीवर आणण्याचे काम हे आपले आहे; तर आपले बिल हे योग्य येईल आणि आपल्याला वाढीव भुर्दंड बसणार नाही.
तसेच जर का आपल्या मीटरचा फोटो ना काढता जर आपल्याला अंदाजे लाईट बिल आले, तर हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तसेच जर आपले वीज बिल काही कारणास्तव थकले असेल आणि जर एखाद्य कंपनीला आपला वीज पुरवठा बंद करायचा असेल तर एक महिना आधी आपल्याला स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे.
दिसता लाईट बिलचं टेन्शन; बिनधास्त वापरा AC, पण हे सेटिंग करा.
पावसाळा सुरूवात झाली असली तरी, वातावरणात अजूनही गारवा निर्माण झालेला नाही. त्यामुळे घरात गारवा (Cooling) राहण्यासठी एसीचा वापर होतोच. उष्णता वाढल्याने काही लोक पंखा वापरतात, कुलर किंवा एसी. हल्ली जास्त वापरला जातो. पण, घरात एअर कंडिशनर( Air Conditioner ) लावला तर बजेट हलतं. कारण लाईट बिल वाढतं. त्यामुळे इच्छा असूनही AC लावता तेत नाही.
बदलत्या वातावरणामुळे गर्मी वाढलेली आहे. कामावरून घरी परतल्यावर आपल्याला निवांत झोप हवी असते. रात्री गरम व्हायला लागलं तर, शांत झोप लागत नाही. त्यामुळे सकाळी चिडचिड होते, कामात लक्ष लागत नाही.अपुऱ्या झोपेने आरोग्य विषयक समस्याही होतात.पण, कारण माहिती असूनही उपाय करता येत नाही.
बऱ्याचवेळा मनात येतं की AC लावावा पण, लाईट बिलची भीती वाटत राहते. AC वापरूनही लाईट बिल कमी यावं यासाठी काही सोपे उपाय करता येतात.
MS-CIT प्रवेश सुरु आहे. अडमिशन लास्ट तारीख ३ मे २०२२ दुपारी ४ वाजे पर्यंत
मो. 9421116604
योग्य टेम्परेचर सेट करा.
काही लोकांना वाटतं की ACचं टेम्परेचर कमी ठेवलं तर जास्त थंडावा मिळतो. त्यामुळे लवकर गारावा मिळण्यासाठी, लोक अनेकदा एअर कंडिशनरवर खुप कमीवर सेट करतात. एअर कंडिशनरचं किमान तापमानात 18 डिग्री सेल्सियसवर सेट करतात. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीनुसार एअर कंडिशनरचं सरासरी तापमान 24 डिग्री सेल्सिअस असतं. हे तापमान शरीरासाठी देखील योग्य आणि आरामदायक आहे. एवढेच नाही तर, काही संशोधनानुसार, AC प्रत्येक वेळी वाढवलेलं 1 डिग्री तापमान जवळपास 6 टक्के वीज वाचवतं. त्यामुळे वीज बिलात कमी यावं असं नाटत असेल तर ACचं सरासरी तापमान 18 डिग्री सेल्सिअसऐवजी 24 डिग्री सेल्सियस ठेवा.
स्टार रेटिंग इक्ट्रॉनिक
इल्क्ट्रॉनिक वस्तूंवर जेवढे जास्त स्टार असता तिवढी विजेची बटत होते. 5 स्टार रेटिंग असलेले AC रूम थंड करतात आणि वीजही वाचवतात.
टाईमर सेट करण्याची सवय
AC मधल्या टायमर सेटिंगचा वापर जरुर करावा. टायमर सेटिंगमुळे ठराविक वेळा एअर कंडिशनर चालू किंवा बंद करता येतो. त्य़ासाठी आपल्याला झोपेतून उठावं लागत नाही. हल्ली AC मध्ये ही सिस्टीम दिलेली असते. टायमर सेट केला तर, AC थोड्या थोड्या वेळाने बंद होतो आणि सुरू होतो. त्यामुळे विजेची बचत होते. यामुळे आपलं बिल बरेच दिवस कमी ठेवण्यास मदत होते.
वेळोवेळी मेन्टेन्स
एसी वापराताना वातावरणं थंड राहवं यासाठी काही काळजी घ्यावी लागते. AC लावताना घरातले दरवाजे, खिडक्या आणि पडदे बंद ठेवावेत. त्यामुळे खोलीतल वातावरण लवकर थंड होईल. ACही चांगल्या प्रकारे काम करेल. विजेचं बिलही कमी येईल. AC व्यवस्थितपणं वापरला तर फायदा होतो.
स्मार्ट एअर कंडिशनर
स्मार्ट एअर कंडिशनर वापरल्याने जास्त वेळ हवेत गारवा राहतो. स्मार्ट AC रुमच्या आतील लोकांच्या हालचालींवर नजर ठेवतो आणि त्यांच्या हालचालीनुसार अटोमॅटिकली बदलतो. स्मार्ट एअर कंडिशनर थंडाव्याची गरज समजून घेऊन त्यांची पद्धत बदलत असतात आणि लाईट कमी खर्च होते.
नियमित सर्व्हिसिंग
नियमित सर्व्हिसिंगमुळे कूलिंगबरोबरच AC चांगल्या स्थितीत राहतो. आता असे AC उपलब्ध आहेत जे वेळोवेळी मशीनच्या आत धूळ आपोआप स्वच्छ करतात. त्यामुळे बरेच चांगले टिकतात. शिवाय, सर्विसींगचा खर्च देखील वाचवतो आणि एअर कंडिशनर जास्त दिवस टिकतो.
तुम्हाला ही माहिती वाचायला आवडली का ?आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते....धन्यवाद.!!
अश्वटेक कॉम्पुटर महाबळेश्वर
मो. ९४२१११६६०४
---------------------------------------------------------------------
MS-CIT प्रवेश सुरु आहे. अडमिशन लास्ट तारीख ३ मे २०२२ दुपारी ४ वाजे पर्यंत
मो. 9421116604



Comments
Post a Comment