एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलत पात्र प्रवाशांना अनिवार्य करण्यात आलेले स्मार्ट कार्ड काढण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता ३० जूनपर्यंत स्मार्ट कार्ड काढता येणार आहे.महिनाभराची मुदतवाढ मिळाल्याने आतापर्यंत स्मार्ट कार्ड न काढता आलेल्या हजारो सवलतधारकांना दिलासा मिळाला आहे. १ जुलै २०२२पासून मात्र स्मार्ट कार्ड बंधनकारक असणार आहे. एसटी महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, पत्रकार यांच्यासह जवळपास २९ समाज घटकांना एसटीच्या प्रवासात ३३ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. ही सवलत मिळविण्यासाठी पात्र लाभार्थींकडे एसटीचे स्मार्ट कार्ड असणे अनिवार्य करण्यात आले आहे.*
३० जूनपर्यंत प्रचलित ओळखपत्रे ग्राह्य धरले जातील
सध्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रचलित ओळखपत्रांच्या आधारे एसटीत प्रवासाच्या सवलतीचा लाभ दिला जात आहे. ही प्रचलित ओळखपत्रे ३० जूनपर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची मुभा दिली जाणार आहे. दि. १ जुलैपासून मात्र ही ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत. स्मार्ट कार्ड असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच सवलतीचा लाभ मिळणार आहे.
रोकड सेवा केंद्र महाबळेश्वर
आपले सरकार सेवा सेतू केंद्र महाबळेश्वर
विलास उतेकर सर मो. 9421116604
Comments
Post a Comment