सरपंच निवडणुकीसाठी पात्रता - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता ,ग्रामपंचायत निवडणूक लागणारे कागदपत्रे
प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायत कार्यालय व गावाची देखरेख करणारा व्यक्ती म्हणजे सरपंच. तर प्रत्येकाची इच्छा असते की गावात आपण सरपंच व्हायचे निवडणूक लढवायची परंतु सरपंच निवडणूक मध्ये उभे राहण्यासाठी किंवा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये उभे राहण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता काय असते ? सरपंच निवडणुकीसाठी पात्रता काय असते ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियम व अटी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळेल
सरपंच निवडणुकीसाठी पात्रता - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता
तुम्हाला जर सरपंच निवडणुकीसाठी उभे राहायचे असेल तर खाली दिलेले पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
1) सरपंच निवडणुकीत उभी राहणारी व्यक्ती भारतीय असावी.
2) उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे.
3) ज्या ग्रामपंचायत साठी निवडणूक लढत आहेत त्या ग्रामपंचायतीचा मतदाता असणे आवश्यक आहे.
4) उमेदवाराकडे ग्रामपंचायत तिचा कोणताही कर घरपट्टी पानपट्टी थकबाकी नसावी.
5) उमेदवार हा शासकीय व सरकारी कर्मचारी नसावा.
6) उमेदवाराच्या नावावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा.
7) ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला दोन पेक्षा जास्त मुलं किंवा आपत्य नसावेत.
8) उमेदवार हा कमीत कमी सातवी पास असणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment