ABHA - Ayushman Bharat Health Account
हे एक डिजिटल हेल्थ कार्ड असेल. त्यात
लोकांच्या आरोग्यासंबंधीची माहिती डिजिटल पद्धतीनं नोंदवलेली आणि सुरक्षित असेल.
या युनिक आयडी कार्डमध्ये तुमचा आजार, उपचार आणि वैद्यकीय चाचण्या
याबाबतची सर्व माहिती नोंदवलेली असेल.
"आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे रुग्णालयांमधली
प्रक्रिया सहज सोपी बनवण्याबरोबरच ईज ऑफ लिव्हिंगदेखील वाढवेल. सध्या
रुग्णालयांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा, केवळ त्या
रुग्णालयापुरता किंवा समुहापुरता मर्यादीत असतो.
मात्र आता हे मिशन
संपूर्ण देशातील रुग्णालयांच्या डिजिटल हेल्थ सोल्युशन्सला एकमेकांशी जोडेल.
त्याअंतर्गत आता देशातील नागरिकांना एक डिजिटल हेल्थ आयडी मिळेल. प्रत्येक
नागरिकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल पद्धतीनं सुरक्षित असेल."
काय आहे हेल्थ कार्ड?
डिजिटल हेल्थ कार्ड हे एकप्रकारे आधार
कार्डसारखंच असेल. या कार्डवर तुम्हाला 14 अंकी क्रमांक मिळेल.
त्या नंबरद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तिला ओळखलं जाईल. त्या माध्यमातून
कोणत्याही रुग्णाची मेडिकल हिस्ट्री (पूर्वीच्या आजारांची माहिती) उपलब्ध होईल.
हे कार्ड म्हणजे एक प्रकारे तुमच्या आरोग्यासंबंधीच्या माहितीचं
खातं असेल. यात आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारची माहिती नोंदवलेली असेल.
यापूर्वी कोणत्या
आजारावर उपचार झाले, कोणत्या रुग्णालयात झाले, कोणत्या
चाचण्या करण्यात आल्या, कोणती औषधं दिली, रुग्णाला नेमके कोणते आजार आहे आणि रुग्ण एखाद्या आरोग्य योजनेशी संलग्न
आहे का? इत्यादीचा त्यात समावेश असेल.
माहिती
कशी नोंदवली जाणार?
या डिजिटल हेल्थ
कार्डमध्ये रुग्णाची संपूर्ण वैद्यकीय माहिती ठेवण्यासाठी रुग्णालयं, दवाखाने आणि डॉक्टर यांना एका सेंट्रल सर्व्हरशी जोडलं जाईल. त्यात
रुग्णालयं, दवाखाने आणि डॉक्टर यांचीही नोंदणी असेल.
त्यासाठी तुम्हाला 'एनडीएचएम हेल्थ रेकॉर्ड्स अॅप' डाऊनलोड करावं लागेल.
त्यात तुम्ही हेल्थ आयडी किंवा पीएचआर अॅड्रेस आणि पासवर्डद्वारे लॉग इन करू शकता.
या अॅपमध्ये तुम्हाला
तुम्ही उपचार केला असेल ते संबंधित रुग्णालय किंवा आरोग्य केंद्र, हेल्थ फॅसिलिटी शोधून लिंक करावं लागेल. त्यांच्याकडे असलेली तुमच्या
आरोग्या संबंधीची माहिती मोबाईल अॅपवर येईल. रुग्णालयांमधील क्यूआर कोड स्कॅन
करूनही रुग्णालय लिंक करता येऊ शकतं.
तुम्हाला हवी असल्यास तुम्हीदेखील प्रिस्क्रिप्शन, चाचण्यांचे रिपोर्ट किंवा इतर माहिती या अॅपमध्ये नोंदवू शकता. त्यासाठी
लॉकरची सुविधाही देण्यात आली आहे.
कोणतेही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णालय तुमच्या सहमतीनं 14 अंकांच्या
युनिक आयडीच्या माध्यमातून तुमची आरोग्यासंबंधीची माहिती पाहू शकेल. त्यासाठी
तुमची सहमती अनिवार्य असेल.
यूझरला हवं तेव्हा ते
आरोग्यासंबंधीची माहिती डिलिटही करू शकतात.
काय
आहेत फायदे?
डिजिटल कार्डचा सर्वांत
मोठा फायदा म्हणजे, याच्या वापराला सुरुवात झाल्यास तुम्हाला
डॉक्टरकडे जुन्या चिठ्ठ्या कागदपत्रं घेऊन जावी लागणार नाहीत.
जुन्या चाचण्यांचे
रिपोर्ट नसतील तर डॉक्टर पुन्हा सगळ्या चाचण्या करायला लावणार नाहीत. त्यामुळे वेळ
आणि पैशाची बचत होईल. तुम्ही कोणत्याही शहरात उपचार केले, तरी डॉक्टर युनिक आयडीच्या माध्यमातून तुमची आरोग्यासंबंधीची जुनी माहिती
पाहू शकेल.

Comments
Post a Comment