
राज्यातील तरुणांना एकात्मिक, सर्वांगीण कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आणि विविध एमटेक अभ्यासक्रम, प्रमाणपत्र
अभ्यासक्रमांद्वारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय
स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्य-आधारित उच्च शिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम
बनवण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सार्वजनिक-अनुदानीत)
स्थापन करण्यात आले आहे.
काैटुंबिक जबाबदाऱयांमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या महिलांना पुन्हा करीअरची संधी पर्सिस्टंट सिस्टम्सने दिली आहे. कंपनीने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला असून विंग्स (WINGS) या उपक्रमांतर्गत महिलांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे.
हा कार्यक्रम महिलांना आवश्यक तांत्रिक कौशल्ये, व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतो, जेणेकरून त्यांचे करिअर आत्मविश्वासाने पुन्हा सुरू होईल. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या भागीदारीमध्ये तयार करण्यात आला आहे, ज्यांना विश्रांतीनंतर त्यांचे करिअर पुन्हा सुरू करण्याची इच्छा असलेल्या राज्यभरातील हजारो महिलांना सक्षम करण्यात मदत होईल. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना पर्सिस्टंटमध्ये स्थान मिळण्याची संधी मिळेल.
कौशल्य विद्यापीठातर्फे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली जाणार असून विद्यापीठाने अलीकडेच
1) इंटरनेट ऑफ थिंग्ज,
2) आर्टिफिशियल इंटेलिजन्स,
3) सायबर सिक्युरिटी,
4) इंडस्ट्री 4.0,
5) बिझनेस अॅनालिटिक्स
6) बीबीए रिटेलसारख्या वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांतर्गत एमटेकसारखे उच्च कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम औद्योगिक भागीदारांशी संलग्न असून ते पूर्ण करणाऱयांना प्रमाणपत्रदेखील प्रदान करण्यात येणार आहेत.
हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पर्सिस्टंट सिस्टम्सद्वारे नियुक्त केले जाईल, या उपक्रमांतर्गत कौटुंबिक जबाबदाऱयांमुळे करीअरपासून 1 ते 4 वर्षे दूर राहिलेल्या आणि तांत्रिकदृष्टय़ा पात्र असलेल्या महिलांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. केवळ कौटुंबिक जबाबदाऱयांमुळे अनेक महिला चांगल्या करीअरपासून वंचित राहतात. त्यांच्यात योग्य क्षमता असूनही त्यांची प्रगती होऊ शकत नाही. या दृष्टीने विंग्स हा या तंत्रकौशल्ये आत्मसात केलेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठीचा एक सामाजिक उपक्रम आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या https://mssu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Comments
Post a Comment