कलाकार मानधन योजना : कलाकारांनी एकरकमी मानधन अर्थसहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन !
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबुन असलेल्या कलाकारांना अर्थसहाय करण्याचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने निर्णय घेण्यात आला होता. या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी संबंधित तहसिल कार्यालय येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
सदर योजनेंतर्गत अर्थसहाय्य एकरकमी एकदाच पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. याबाबत संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुबंई यांच्या स्तरावरुन वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित तहसिल कार्यालय येथे अर्ज सादर करण्यास कळविण्यात आले आहे.
एकल कलाकाराकरीता पात्रता, निकष व अटी पुढील प्रमाणे आहे.
१) एकल कलावंत महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असलेले असावे,
२) आर्थिकदृष्टया दुर्बल कलाकार, कलाकाराचे महाराष्ट्रात 15 वर्षापासुन वास्तव्य असावे,
३) कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असावे,
४) कलाकाराचे वार्षिक उत्पन्न 50 हजाराच्या आत असावे,
५) केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतुन मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच वैयक्तिक शासकीय अर्थसहाय योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
६) यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या कलावंतांना या योजनेचा दुबार लाभ घेता येणार नाही.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह दि. 30 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावा. योजनेबाबत अधिक माहिती व अर्जाचा नमुना तहसिल कार्यालय, पंचायत समिती, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद येथे उपलब्ध आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.
माहितीसाठी सादर
अर्ज आमचेकडे उपलब्ध आहे

Comments
Post a Comment