सातबारा मिळकत पत्रिकावर आता यु एल पिन UL PIN बंधनकारक केंद्र शासनाच्या सूचनेला राज्याची मान्यता
सातबाऱ्यावर यु एल पिन नंबर देण्यास शासनाने मान्यता दिली आहे राज्यातील सर्व सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिका वर यापुढे अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक म्हणजेच यु एल पिन नंबर दिसणार आहे.
सातबारा UL PIN संदर्भातील एक शासन निर्णय 30 नोव्हेंबर 2022 रोजी काढण्यात आलेला आहे. हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
UL PIN मुळे सातबऱ्यामध्ये मोठा बदल काय पडेल
महाराष्ट्र राज्यात याआधीपासूनच गावनिहाय्य दस्तऐवज जतन केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक गावातील महसुली दप्तरांमध्ये पहिल्या क्रमांकापासून सुरुवात केली जाते.
आता मात्र UL PIN येणार असल्याने देशातील कोणत्याही मालमत्ता दस्तावर स्वतंत्र क्रमांक दर्शविला जाईल व त्याची दस्ताऐवजाची ओळख तात्काळ पटवणे शक्य होईल.
UL PIN मुळे असे होणार सातबारा उताऱ्यावरील बदल
गट क्रमांक व उपविभागाच्या उल्लेखाआधी आता पिन क्रमांक टाकला जाईल.
सातबारा उतारा दस्ताऐवजावर यू एल पीन संबंधीचा स्कॅन केला जाणारा क्यूआर कोड दिसेल. हा कोड सातबाऱ्याच्या उजव्या कोपऱ्यात असेल आणि या ठिकाणी एक क्रमांक देखील दिला दिसेल.
मिळकत पत्रिकेच्या मध्यभागी महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह असेल.
पत्रिकेवरील पहिल्या ओळीच्या वरील डाव्या बाजूला यू एल पिन क्रमांक दिला जाईल.
जसा नागरिकांना आधार क्रमांक दिला जातो आणि त्याद्वारे संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळते अगदी अशाच पद्धतीने हा युएलपिन काम करणार आहे. UL PIN मुळे सातबऱ्यामध्ये मोठा बदल झाला असून यामुळे दस्ताऐवज मिळविणे खूपच सोपे ह होणार आहे.
थोडक्यात यु एल पिन म्हणजे मालमत्तेचा आधार क्रमांकच आहे.
युएल पिनमुळे संपूर्ण माहिती अगदी एका क्लिकवर मिळण्यास मदत होणार आहे.


Comments
Post a Comment