आर.टी.ई. २५ % ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतचीच असावीत.
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला येत्या सुरुवात होणार आहे.
|
अ नं |
कागदपत्राचा प्रकार |
वैध कागदपत्रांची सूची |
|
1 |
रहिवासाचा / वास्तव्याचा पुरावा (सर्व
प्रवेशपात्र बालकांकरिता) |
रेशनिंग कार्ड,
ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा
परवाना) वीज टेलिफोन बिल देयक, पाणी
पट्टी, प्रॉपर्टी
टॅक्स देयक घरपट्टी, फक्त
राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड, मतदान
ओळखपत्र, पासपोर्ट
या पैकी कोणतेही एक निवासी पुराव्याकरिता गॅस बुक रद्द करण्यात आलेले आहे. ही
कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत
भाडेकरारनामा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.... |
|
2 |
वंचित जात सवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
वडिलांचे / बालकाचे) |
उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही.
तहसीलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांचे जात प्रमाणपत्र.
पालकाचा (वडिलांचा / बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक परराज्यातील जातीचे
प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार नाही.. |
|
3 |
दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे |
जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधीक्षक,
अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय याचे ४०
टक्के आणि ४०% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र. |
|
4 |
HIV बाधित/प्रभावित असल्यास |
जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधीक्षक,
अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे
प्रमाणपत्र |
|
5 |
आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा
दाखला |
तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे
प्रमाणपत्र, salary स्लीप
कंपनीचा किंवा Employer चा
दाखला, (आर्थिक
वर्ष २०२० - २०२१ किंवा २०२१-२०२२ मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न
असलेले) उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राहय धरण्यात येणार नाही. |
|
6 |
जन्माचा दाखला (सर्व प्रवेशपात्र
बालकांकरिता) |
ग्रामपंचायत / न.पा./ म.न.पा. यांचा दाखला
रुग्णालयातील ANM रजिस्टर
मधील दाखला / आंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला / आई,
वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे
केलेले स्वयंनिवेदन. |
|
7 |
घटस्फोटित महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे |
1) न्यायालयाचा निर्णय. २) घटस्फोटित
महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे
किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील
असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.. |
|
8 |
न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील
महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे |
1) घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट
असल्याचा पुरावा. २) घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा/ बालकाच्या
आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या
वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या
आईचा उत्पनाचा दाखला |
|
9 |
विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे |
1) पतीचे मृत्यूपत्र ( प्रमाण पत्र) २)
विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असल्यास
बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल
गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. |
|
10 |
एकल पालकत्व असल्यास (single
parent) आवश्यक कागदपत्रे |
आई किंवा वडील या पैकी निवडलेल्या व्यक्तीची
कागदपत्रे ग्राह्य |
|
11 |
अनाथ बालके असल्यास |
१) बालगृह / अनाथ बालकांच्या बाबतीत
अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. २)जर बालक अनाथालयात राहत नसेल तर
जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील |
अधिक माहितीसाठी संपर्क


Comments
Post a Comment