Skip to main content

10 वी १२ नंतर शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक तसेच नोकरी संदर्भात लागणारे विविध दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी (चेकलीस्ट)




 शैक्षणिक कामांसाठी, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, नोकरी संदर्भात आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी शासनाच्या नियमावलीनूसार आवश्यक कागदपत्रांची यादी (चेकलीस्ट)

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठीही शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशावेळी दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रूटी आढळल्यातर पुन्हा फेऱ्या वाढतात. यामुळे वेळेसोबत विनाकारण आर्थिक नुकसानही होते. पालक आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये,  यासाठी शासनाने ई-सेवा केंद्र, आपले सरकार, सेतु यासारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सेवांमुळे शासकीय दाखले मिळणे सोपे झाले आहे.

शैक्षणिक तसेच नोकरी संदर्भात लागणारे विविध दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी (चेकलीस्ट) पुढील प्रमाणे आहे.

उत्पन्न दाखला (1 वर्षे किवा 3 वर्ष ) :

1.तलाठी रहिवाशी दाखला, 

2. तलाठी उत्पन्न दाखला १ वर्ष किवा 3 वर्ष , 

3. शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, 

4. नोकरी असलेस पगार दाखला, 

5. पेन्शन असलेस पासबुक झेरॉक्स, 

6. रेशन कार्ड झेरॉक्स, 

7. आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

डोमासाईल   दाखला / डोंगरी दाखला/ SEC(स्थानिक रहिवासी दाखला   :-

तलाठी रहिवाशी दाखला

 शाळा सोडलेचा दाखला, जन्मनोंद, 

वडील शाळा सोडलेचा  दाखला 

शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, 

10 वी किवा १२ वी प्रमाणपत्र 

घराचा 8 अ उतारा किवा असेसमेंट उतारा किवा CTS उतारा 

 रेशन कार्ड झेरॉक्स, 

आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.


आर्थिकदृष्ट्या मागास    दाखला / EWS दाखला  स्टेट किवा सेन्ट्रल  :-

तहसीलदार उत्पन्न दाखला 

तलाठी रहिवाशी दाखला

 शाळा सोडलेचा दाखला, जन्मनोंद, 

वडील शाळा सोडलेचा  दाखला 

शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, 

10 वी किवा १२ वी प्रमाणपत्र 

घराचा 8 अ उतारा किवा असेसमेंट उतारा किवा CTS उतारा 

स्वयंम घोषणापत्र 

 रेशन कार्ड झेरॉक्स, 

आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

100 चा बॉंड 

सर्कल चौकशी अहवाल 

(टीप : 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न , १००० स्केअर फुट पेक्षा कमी घर व 5 एकर पेक्षा कमी जमीन असले तरच सदर दाखला मिळू शकतो.) 

नॉन क्रिमीलेयर  दाखला :-

तलाठी रहिवाशी दाखला, तलाठी चौकशी अहवाल 

 तलाठी 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, 

शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, 

जात दाखला 

तहसील उत्पन्न दाखला 3 वर्ष 

10 वी किवा १२ वी प्रमाणपत्र 

घराचा 8 अ उतारा किवा असेसमेंट उतारा किवा CTS उतारा 

जात दाखलेवेळी दिलेला मानवी पुरावा 

नोकरी असलेस पगार दाखला,

 पेन्शन असलेस पासबुक झेरॉक्स,

 रेशन कार्ड झेरॉक्स, 

आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.


उत्पन्न दाखला सरकारी योजना/वैद्यकिय कामी :-

तलाठी रहिवाशी दाखला, 

तलाठी उत्पन्नाचा दाखला, 

मंडळ अधिकारी (सर्कल) चौकशी अहवाल, 

शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ,

 रेशन कार्ड झेरॉक्स, 

आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

शेतकरी  दाखला  :-

तलाठी रहिवाशी दाखला, 

शेतकरी असलेचा तलाठी   दाखला, 

मंडळ अधिकारी (सर्कल) चौकशी अहवाल, 

 7/12 उतारा व 8 अ,

 रेशन कार्ड झेरॉक्स, 

आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

100 चा स्टेम्प पेपर 

अर्ज 

स्वघोषणापत्र 

अल्पभूधारक  दाखला  :-

तलाठी रहिवाशी दाखला, 

 तलाठी चौकशी   दाखला, 

मंडळ अधिकारी (सर्कल) चौकशी अहवाल, 

 7/12 उतारा व 8 अ,

 रेशन कार्ड झेरॉक्स, 

आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

अर्ज 

100 चा स्टेम्प पेपर 

स्वघोषणापत्र  अर्जदार फोटो 


जातीचा दाखला :

तलाठी रहिवाशी व जातीचा दाखला, 

अर्जदार शाळा सोडलेचा दाखला, जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड, 

वडील, आजोबा, पणजोबा, चुलत आजोबा, चुलत पणजोबा, यांचा शाळा सोडलेचा दाखला, जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड (मयत असल्यास मृतयुनोंद) सदर दाखल्यावर जातीचा उल्लेख असणे आवश्यक आहे, 

ओबीसी साठी 1967 पूर्वीचा जात पुरावा, 

एसबीसीसाठी 1961 पूर्वीचा जात पुरावा, 

व्हीजेएनटीसाठी 1961 पूर्वीचा जात पुरावा, 

एस.सी. साठी 1950 पूर्वीचा जात पुरावा, 

कुणबीसाठी 1920 ते 1930 मधील पुरावा,

 पोलीस पाटील व सरपंच यांचे सहीने वंशावळ, सरळ वंशावळ नसल्यास महसूली पुरावे,

 रेशनकार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो. 


जात पडताळणी  :-

प्राथमिक शाळा सोडलेचा  दाखला 

माध्यमिक शाळा सोडलेचा  दाखला 

१५ नंबर फॉर्म ( यावर कॉलेज सही करून देते)

कवरिंग लेटर कॉलेजमध्ये मिळते 

मुलाचा जातीचा दाखला 

वडिलांचा शाळा सोडलेचा  दाखला 

आजोबांचा  शाळा सोडलेचा  दाखला किवा जन्म दाखला किवा फेरफार उतारा किवा जुना ७/१२  उतारा 

100 चे 2 स्टेम्प पेपर (आमचे येथे प्रतिज्ञापत्र करून मिळते) 

आधार कार्ड /मुलाचे फोटो व सही 

( इलेक्शन व नोकरी साठी चे जात पडताळणी फॉर्म भरून मिळेल. 


गॅझेट (राजपत्र) :

नावात बदल वेगळी नावे असणारे दोन पुरावे, उदा. मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, 7/12 किंवा 8 अ उतारे, ॲफिडेव्हीट, इतर,

 जन्मतारखेत बदल : जुनी जन्म तारीख व नविन जन्म तारीख यांचे पुरावे व मतदान ओळखपत्र, आधारकार्ड झेरॉक्स इत्यादी. नाव, 

जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करण्यासाठी (गॅझेट) राजपत्र नोंदणी अर्ज  


आधारकार्ड :

नवीन -18 वर्षावरील : मतदान ओळखपत्र व रेशनकार्ड 

5 ते 18 वर्षामधील : जन्म नोंद दाखला व रेशनकार्ड. 

5 वर्षाखालील : जन्म नोंद दाखला , आई/वडिलांचे आधारकार्ड

दुरुस्ती –

विवाहानंतर असेलतर :

विवाह नोंदणी दाखला  किवा शासकीय राजपत्र  किवा मतदान कार्ड 


पॅनकार्ड :

2 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, 


नविन किंवा विभक्त रेशनकार्ड :

स्वत:चे नावे घरठाण उतारा, स्वत:चे नावे घरपटटी पावती, स्वत:चे नावे लाईट बील, तहसिलदार यांच्या सहीचा उत्पन्न दाखला, धान्य दुकानदार यांचा विभक्त असलेला दाखला, पोलीस पाटील यांचा विभक्त असलेला दाखला, जुन्या रेशनकार्डची झेरॉक्स, 100 रु. स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र (आई-वडीलांच्या रेशनकार्डमध्ये किमान एक मुलगा तरी राहिला पाहिजे, जर मुलगा विभक्त किंवा नविन रेशनकार्ड दिले जाणार नाही.)

रेशनकार्डवरील नाव कमी करणे :

मयत नाव कमी करणेसाठी मृत्यु नोंद दाखला व मूळ रेशनकार्ड, विवाह झालेले नाव कमी करणेसाठी विवाह नोंद दाखला व मूळ रेशनकार्ड, नोकरी किंवा इतर कारणास्तव नाव कमी करणेसाठी तेथील तलाठी रहिवाशी दाखला किंवा नोकरीचे पत्र व मूळ रेशनकार्ड.


दुबार/हरवलेले रेशनकार्ड :

धान्य दुकानदार यांचा रेशनकार्ड खराब/हरवलेचा दाखला, तहसीलदार यांच्या सहिने उत्पन्न दाखला, हरवलेले असल्यास पोलीस स्टेशनचा दाखला, खराबसाठी मुळ रेशनकार्ड/हरवलेले असल्यास झेरॉक्स, सर्वांची आधारकार्ड झेरॉक्स.

रेशनकार्डवर नाव वाढवणे :

मुलांची नावे वाढवण्यासाठी –

जन्म दाखला, बोनाफाईड, आधारकार्ड झेरॉक्स, स्वत:चे रेशनकार्ड, 

पत्नीचे नावे वाढवण्यासाठी -विवाह नोंद दाखला व जुन्या रेशनकार्ड मधील नाव कमी केलेचा दाखला. (पत्नी तालुक्याच्या बाहेरची असेल तर नाव कमी केलेचा दाखला किंवा पत्नी तालुक्यातील असेल तर माहेरचे रेशनकार्ड) आधारकार्ड झेरॉक्स व स्वत:चे रेशनकार्ड

(टीप :- प्रत्येक तहसीलदार ऑफिस मध्ये कागदपत्रांमध्ये थोडा फार  बदल असू  शकतो)

संपर्क 

अश्वटेक कॉम्पुटर आपले सरकार सेवा /सेतू केंद्र महाबळेश्वर

ओरचीड शॉपिंग मॉल ,HDFC बँक जवळ महाबळेश्वर  

मो. ९४२१११६६०४ / ८८३०५५९९३१ 



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...