जात वैधता प्रमाणपत्रासाठी सविस्तर प्रोसेस Caste Validity Certificate
जात वैधता प्रमाणपत्रासाठी निर्गमित करण्याची प्रक्रिया 01 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन झाली आहे.
जात वैधता प्रमाणपत्र विविध प्रकारच्या राखीव जागांसाठी म्हणजेच शिक्षण(Education), निवडणूक(Election), सेवा( Service) आणि इतर( Other) साठी अर्ज केला जातो.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी, जातीच्या दाखल्याबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येत आहे. त्या अनुरोधाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून, त्यांनी जातीचा दाखला प्राप्त झाल्याबरोबर जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
अर्जाचा प्रकार: (Type of Application) :
• शिक्षण(Education)
• निवडणूक(Election)
• सेवा( Service)
• इतर( Other)
सक्षम प्राधिकरणाकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कागदपत्राचे नाव:
आमचा पत्ता
अश्वटेक कॉम्पुटर आपले सरकार सेवा केंद्र,
सेतू केंद्र महाबळेश्वर
३५ ओर्चीड शॉपिंग मॉल , बँक ऑफ महाराष्ट्र सामोर,
HDFC बँक जवळ मस्जिद रोड,महाबळेश्वर
मो. 9421116604 / 8830559931

Comments
Post a Comment