शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवून घेणे बंधनकारक योजनेचे नाव : शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नाव शेतकरी विशिष्ट ओळखपत्र कोणी सुरुवात केली केंद्र शासन चालू वर्ष 2025 लाभार्थी देशातील शेतकरी उद्देश शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना योजनांचा अधिक चांगला लाभ मिळवून देणे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आता शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी “फार्मर आयडी” ( Farmer ID) बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आयडीचा उद्देश हा शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना योजनांचा अधिक चांगला लाभ मिळवून देणे आहे. विविध सरकारी योजना , अनुदान , शेती विषयक योजना , कृषी विषयक सल्ले आणि इतर सेवांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी हा आयडी आवश्यक आहे. Farmer ID Registration याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत. ü फार्मर आयडी म्हणजे काय ? ü फार्मर आयडी चा उद्देश काय आहे ? ü फार्मर आयडी चे फायदे ü फार्मर आयडी कसा मिळवावा ? ...