मागेल त्याला सोलर पंप, जमिनीच्या क्षेत्रानुसार दिले जाणारे पंप,लाभार्थ्यांनी भरायचा हिस्सा,आवश्यक कागदपत्रे सर्व माहिती
मागेल त्याला सोलर पंप
|
योजनेचे नाव |
मागेल त्याला
सोलार पंप योजना |
|
कोणी सुरुवात
केली |
महाराष्ट्र
शासन |
|
चालू वर्ष |
2025 |
|
लाभार्थी |
महाराष्ट्रातील
शेतकरी |
|
उद्देश |
शेतकऱ्यांना
कमी खर्चात सिंचनासाठी शाश्वत आणि स्वतंत्र पाणीपुरवठा साधन उपलब्ध करून देणे |
|
अर्ज करण्याची
पद्धत |
ऑनलाईन |
योजनेची ठळक वैशिष्टे
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत
योजना
- सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम
भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
- अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी
हिस्सा ५ टक्के
- उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
- जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
- पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
- वीजबिल नाही, लोडशेडिंगची
चिंता नाही
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
योजनेच्या लाभासाठी पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराने आधी कोणत्याही सौर पंपाचा फायदा घेतलेला
नसावा.
- अर्जदाराकडे स्वतःच्या नावे किंवा भागीदारीत जमीन
असावी.
- सामायिक जमिनीच्या बाबतीत, सर्व भोगवाटेदारांची संमती पत्र असणे आवश्यक आहे.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही
वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी
पात्र राहतील.
- ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री
महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या
पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार
नाहीत.
- अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या
योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र
असतील.
जमिनीच्या क्षेत्रानुसार दिले जाणारे पंप
|
अश्वशक्ती क्षमता (HP) |
जमिनीचे क्षेत्र |
|
3 HP |
2.5 एकरापर्यंत |
|
5 HP |
2.51 एकर ते 5
एकरापर्यंत |
|
7.5 HP |
5 एकरा पेक्षा
जास्त |
लाभार्थ्यांनी भरायचा हिस्सा
|
अश्वशक्ती क्षमता (HP) |
SC / ST |
इतर प्रवर्गांनी भरायची रक्कम |
|
3 HP |
11486/- |
22971/- |
|
5 HP |
16038/- |
32075/- |
|
7.5 HP |
22464/- |
44928/- |
अर्ज करण्याकरिता आवश्यक
कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती
लाभार्थींसाठी
- पासपोर्ट साईज फोटो
- 7/12 उताऱ्यावर विहिर किंवा कुपनलिका
नोंद आवश्यक
- सामाईक क्षेत्र असल्यास इतर हिस्सेदारांचा / मालकांचा
ना हरकत दाखला
- पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र
निष्कर्ष
योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कमी खर्चात सौर पंप देऊन सिंचनासाठी
पाणी पुरवण्याचे आहे. यामुळे विजेच्या तुटवड्यातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी
पाण्याचा वापर करता येतो, आणि उत्पन्न वाढवता येते. या योजनेमुळे
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, विमा आणि दुरुस्तीची हमी
मिळते, जे त्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण
आहे.
मागेल त्याला
सौर कृषी पंप योजना काय आहे ?
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत
जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने
विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप
योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित
करण्यात येणार आहेत.
मागेल त्याला
सौर कृषी पंप योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे ?
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत
जलस्त्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपारिक कृषीपंपाकरीता वीजपुरवठा देण्यात
आला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित असलेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल.
सौर कृषीपंप
म्हणजे काय ?
सौर कृषीपंप हा सुर्याच्या
किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासुन चालणारा पंप आहे. सौर पंपामध्ये मुख्यत: सोलर
पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण
उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे.
Comments
Post a Comment