Skip to main content

शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवून घेणे बंधनकारक

 



शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवून घेणे बंधनकारक

योजनेचे नाव: 

शेतकरी विशिष्ट ओळखपत्र

नाव

शेतकरी विशिष्ट ओळखपत्र

कोणी सुरुवात केली

केंद्र शासन

चालू वर्ष

2025

लाभार्थी

देशातील शेतकरी

उद्देश

शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना
योजनांचा अधिक चांगला लाभ मिळवून देणे

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

 

आता शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी “फार्मर आयडी” (Farmer ID) बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आयडीचा उद्देश हा शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना योजनांचा अधिक चांगला लाभ मिळवून देणे आहे. विविध सरकारी योजना, अनुदान, शेती विषयक योजना, कृषी विषयक सल्ले आणि इतर सेवांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी हा आयडी आवश्यक आहे. Farmer ID Registration याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखामधून पाहणार आहोत.

ü फार्मर आयडी म्हणजे काय ?

ü फार्मर आयडी चा उद्देश काय आहे ?

ü फार्मर आयडी चे फायदे

ü फार्मर आयडी कसा मिळवावा ?

ü Farmer ID Registration आवश्यक कागदपत्रे

ü अर्ज करताना घ्यायची काळजी

ü Conclusion : निष्कर्ष

ü फार्मर आयडी म्हणजे काय ?

ü फार्मर आयडी” चा उद्देश काय आहे ?

 

फार्मर आयडी म्हणजे काय ?

फार्मर आयडी एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे जो शेतकऱ्यांच्या विविध माहितीचा डेटा शासनाकडे तयार केला जातो. हा आयडी शेतकऱ्यांच्या नोंदीसाठी वापरला जातो आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ठरतो. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेताचे क्षेत्रफळ, जात, जमीन संबंधित माहिती, आणि इतर संबंधित माहिती समाविष्ट केली जाते.

 

फार्मर आयडी चा उद्देश काय आहे ?

·       फार्मर आयडी मुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल.

·       शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती एका ठिकाणी एकत्र केली जाईल.

·       यामुळे शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.

·       सर्व माहिती एकत्र असल्यामुळे सर्व ठिकाणी कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही.

·       शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

·       सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल, उदाहरणार्थ किसान सन्मान योजना, तर फार्मर आयडी आवश्यक आहे.

·       शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी चा खूप फायदा होऊ शकतो.

·       शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.

फार्मर आयडी चे फायदे

·       शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि सेवांचा सहज लाभ मिळेल.

·       डिजिटल पद्धतीने पीक आणि पिक कर्ज मिळवता येईल.

·       हवामानाच्या आधारे कीड आणि रोगाचा अंदाज घेता येईल.

·       मृदा आरोग्याबद्दल योग्य माहिती मिळेल, ज्यामुळे माती कोणत्या पिकासाठी योग्य आहे हे समजेल.

·       शेतकऱ्यांना एकाच पर्यायातून अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळेल.

·       पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे.

·       महाडीबीटीवरील योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी चा उपयोग होईल.

·       डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन होऊन त्यांच्या शेतीच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवांचा त्वरित लाभ घेता येतो.

·       शेतकर्‍यांना बाजार भावाची नियमित माहिती मिळेल.

·        

फार्मर आयडी कसा मिळवावा ?

फार्मर आय डी मिळवण्यासाठी शासनामार्फत एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे, या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून आय डी मिळवता येणार आहे.अर्ज प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, आणि जमीन तपशील नोंदवावे लागेल. त्यानंतर, सातबारा उतारा, आधार कार्ड, आणि बँक खाते तपशील यांसारखे आवश्यक माहिती भरावी लागेल. प्रशासन तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला फार्मर आयडी क्रमांक दिला जाईल.

 

आवश्यक कागदपत्रे

·       7/12 उतारा

·       शेतकर्‍याचे आधार कार्ड

·       बँक खाते पासबुक

·       रेशन कार्ड

·       शेतकऱ्याचे छायाचित्र

·       मोबाइल नंबर (ओटीपीसाठी)

·       शेतजमिनीचा तपशील

·       इतर संबंधित कागदपत्रे

अर्ज करताना घ्यायची काळजी

अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात (GR) नीट वाचुन पहा.

तुमची लाभार्थी पात्रता GR नुसार आहे का तपासा.

अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

अर्ज योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.

अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

Conclusion : निष्कर्ष

Farmer ID Registration Maharashtra हे एक अशी ओळख आहे, ज्याद्वारे त्यांच्या ओळखीची नोंदणी आणि सरकारी योजनांचा लाभ अधिक सुलभ आणि कार्यक्षमतेने मिळू शकतो. डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांच्या माहितीचे संकलन होऊन त्यांच्या शेतीच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवांचा त्वरित लाभ घेता येतो. परिणामी, शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुलभ आणि समृद्ध होण्यास मदत होते.

 

फार्मर आयडी म्हणजे काय ?

फार्मर आयडी” ही एक विशिष्ट डिजिटल ओळख आहे जी आधार आणि राज्याच्या जमिनीच्या नोंदींशी जोडलेली असते. यालाच “शेतकरी ओळख पत्र” असेही म्हणतात.

 

फार्मर आयडी” चा उद्देश काय आहे ?

फार्मर आयडी” चा उद्देश हा शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना योजनांचा अधिक चांगला लाभ मिळवून देणे आहे.



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...