Skip to main content

वहिवाटीच्या रस्त्याला अडवणूक झाली असेल तर असा करा अर्ज

 

 



वहिवाटीच्या रस्त्याला अडवणूक झाली असेल तर असा करा अर्ज

अस्तित्वात असलेल्या रस्त्याबाबत कोणीही सूट भावनेने अथवा त्रास व्हावा या हेतू अडथला केल्यास किंवा काही बाधा होईल असे कृत्य केल्यास न्याय मागता येत असतो. यासाठी अत्यंत सोपी व जलव प्रक्रिया आहे आणि या अंतर्गत केवळ ८ ते १० दिवसांत सम्बन्धित रस्ता खुला करण्यात येतो. त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आपण पाहूया.

 

१.१. अर्जदाराचे मा. तहसिलदारकोर्ट कायदा अन्वये अर्ज सादर करावा लागतो.


२. अर्ज साधा व शेतकर्याच्या भाषेतील असला तरी चालतो आणि त्यासाठी कायद्याची भाषा व काटेकोरपणाची आवश्यकता नाही तसेच अगदी आपल्या बोली भाषेतील अर्ज घरीच लिहिला तरी चालतो.

 

3. अर्जाच्या सर्वात वर मामलेदार कोर्ट कायदा कलम ५ अन्वये अर्ज असे लिहावे लागते.

 

४. अर्जात अडथला निर्माण केलेल्या शेतकर्याचे नाव पत्ते (संपूर्ण माहिती) मोबाईल नंबर लिहावेत.

 

५. अडथला झालेला रस्ता हा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता असावा लागतो.( गुगल  मेप कढला असेल तर उत्तम)

 

६. अर्ज अडथला केव्हा निर्माण केला त्याची तारीख व उद्भवल्याचे  स्वरूप लिहावे लागते.

 

७. अडथला निर्माण झाल्यापासून ६ महिन्याच्या आत अर्ज केला पाहिजे

 

८. नव्या रस्त्यास मागणीसाठी हा सदर अर्ज लागू होत नाही. नवीन रस्ता हवा असेल तर दुसर्या पद्धतीने अर्ज करावा.

 

९. वहिवाटीचा रस्त्यास अडथला झाल्यावरच हा अर्ज करता येत असतो.

 

१०. या प्रक्रियेत अर्ज सादर केल्यानंतर ३ दिवसात अडथला निर्माण करणाऱ्या शेतकर्यांना नोटीस देऊन व आडवलेल्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी  करून ८ दिवसात न्याय देऊन वहिवाटीचा रस्त्याचा हक्क दिला जात असतो.

 

महत्याच्या सूचना  

१.     केवळ कायद्याने रस्ता मिळतो.

२.      

२. सर्व पाहणी व आवश्यकता उपयोगिता या बाबींचा विचार करूनच रस्ता दिला जात असतो.

 

३. शक्य तो परस्पर सहकार्यारून व सर्वाना उपयोगी होईल या हेतूने रस्ता असल्यास वाद निर्माण होत नाही.

 

४. पूर्वापार असलेल्या वहिवाटीवर अडथला निर्माण झाल्यास जागरूकता दाखवून लवकरात लवकर तो दूर होईल यासाठी स्थानिक पातळीवर प्रयतन करावे आणि तसे करूनही प्रश्न सुटत नसेल तर मामलेदार कोर्ट कायदा अन्वये सादर करावा लागतो.

 

५. नवीन वहिवाट रस्ता मागणी किंवा पूर्वापार वाहिवातीव्र अडथला यासाठी फार कायद्याचे ज्ञान असावे असे नसून स्वत अर्ज सादर करूनही आपण आपले म्हणणे मांडू शकत आहात.

 

६. इतरांची मालमता नसलेल्या सर्व जमिनी, रस्ते,गल्या, मार्ग, वहिवाट, इ. वर शासनाची मालकी असते.

 

७. कोणत्याही जमिनीवरील रस्ते वहिवाट विषयी वाद निर्माण झाल्यास मा. जिल्हाधिकारी सो यांना पाहणी व निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यावेळी त्याची उपयोगिता व आवश्यकता विचार घेऊन रस्त्याचे हक्क ठेवणे किंवा रद्द करणे या विषयी निर्णय होऊ शकतो.

 

८. प्रत्येक अर्जाची व कागदपत्राची स्थल प्रत स्वताकडे असणे आवश्क आहे.



माहितीसाठी सादर 

अश्वटेक कॉम्पुटर आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर 



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...